विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त 6 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे विकासरत्न विद्या विकास मंडळाचे सचिव मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त 6 फेब्रुवारी रोजी यशवंत परिवाराच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, यशवंत व्यायामशाळा या नूतन व्यायामशाळेचे उद्घाटन नूतन प्राध्यापक कक्षाचे( स्टाफरूम) उद्घघाटन तसेच यशवंत परिवाराच्यावतीने भव्य असा नागरी सत्काराचा कार्यक्रम विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे वरिष्ठ कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकत्तर कर्मचारी परिश्रम घेत असून विलासराव घुमरे सर यांच्या वाढदिवसाला उपस्थित रहावे असे आवाहन यशवंत परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे अशी माहिती उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक सर यांनी दिली आहे.
