करमाळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये संगोबा शाळेची बाजी
करमाळा प्रतिनिधी
2 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मच्छिंद्र नुसते विद्यालय कविटगाव या ठिकाणी आयोजित केलेले होते या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सर्वच शाळांनी सहभाग नोंदवलेला होता यामध्ये श्री संगमेश्वर विद्यालय संगोबा या प्रशालेचा प्रथम क्रमांक आला आहे . इयत्ता दहावीतील शुभम संतोष गायकवाड व शुभम नवनाथ खराडे या दोन विद्यार्थ्यांनी उत्तम प्रयोग सादर केला .या यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानदेवराव गायकवाड,सचिव ऍड रमण मस्के, सह सचिव श्री विनय ननवरे व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुनिल शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे .या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री देवानंद महादेव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले .
