श्री कमलाभवानी भक्त ढाळेबंधुकडुन आई कमलाभवानी चरणी चांदीचा दरवाजा अर्पण
करमाळा प्रतिनिधी करमाळ्यातील सुवर्णकार तथा माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे व ओंकार ढाळे यांनी श्री कमलाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यासाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्त चांदीचे दरवाजे अर्पण केले आहेत. हे दरवाजे बसवण्याचे कामही पूर्ण झाले असून कोरोनानंतर उघडत असलेल्या मंदिरानंतर भक्तांना या चांदीच्या दारातूनच गाभाऱ्यात प्रवेश होणार आहे.
या दरवाजाची कलाकुसर ढाळे यांच्या कलाकारांनी अहोरात्र मेहनत घेऊन केली आहे. मंदिर समितीकडून विश्वस्त डॉ. प्रदिपकुमार पाटील यांच्या हस्ते यावेळी ढाळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉ. महेंद्र नगरे, सुशील राजन राठोड, अशोक घाटे, महादेव भोसले, दादासाहेब पुजारी, विजय पुजारी, नारायण सोरटे, मधूकर सोरटे, दीपक सोरटे, भाऊसाहेब फुलारी, लक्ष्मण हवालदार, रत्नदीप पुजारी उपस्थित होते.
