कोरोना संसर्गाचे प्रतिबंधित उपाय योजनांची अंमलबजावणी करून तालुक्यातील धार्मिक स्थळ भाविकांसाठी खुली होणार-श्रीमती ज्योती कदम
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य यांचे कडील दि.24/09/2021 रोजीचे आदेशातील मार्गदर्शक सुचना व त्या अनुषंगणे जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कडील दि.04/10/2021 रोजीचे आदेशान्वये आज दि.06/10/2021 रोजी श्रीमती ज्योती कदम उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी यांनी तालुक्यातील प्रमुख देवस्थानाचे पुजारी,सरपंच,पोलीस पाटील व विभाग प्रमुख यांची सभा घेतली.त्यामध्ये देवस्थानचे पुजारी व स्थानिक स्वराज संस्था यांनी कोरोना संसर्गाचे प्रातिबंधित उपाय योजनांची अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे.त्यानुषंगणे धार्मिक स्थळ परिसरामध्ये कोरोना संसर्गाचे प्रातिबंधित उपाय योजनांची काटेकोरपने खलील प्रमाणे अंमलबाजवणी करण्याच्या सूचना ज्योती कदम यांनी दिल्या.देवस्थान समितीने अल्कोहोल युक्त सेनिटाझर,थर्मल गन पुरवणे परिसर स्वछ ठेवणे आवश्यक आहे.मास्क वापरणे सक्तीचे राहील.दोन व्यक्ती मध्ये कमीत कमी सहा फुट अंतर असणे आवश्यक.धार्मिक स्थळी भजन,कीर्तन,गाणे यांचे कार्यक्रम घेता येणार नाहीत.मूर्तीला स्पर्श करता येणार नाही.प्रसाद वाटप,खाद्य पदार्थाचे स्टॉल लावता येणार नाहीत.छबिना,मिरवणूक काढता येणार नाही.सादर सभेस तहसीदार समीर माने, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,गटविकास अधिकारी राऊत इ विभाग प्रमुख उपस्थित होते.
