करमाळा शहर अध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्या हस्ते भाजपा शहर उपाध्यक्षपदी राजू सय्यद यांची नियुक्ती
करमाळा प्रतिनिधी करमाळा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर मंडल अध्यक्ष जगदीश अगरवाल यांच्या हस्ते भाजपा शहर उपाध्यक्षपदी राजू सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली.सदर निवडीचे पत्र त्यांना यावेळी देण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन करून व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, नितीन झिंजाडे,उपाध्यक्ष बंडूशेठ शिंदे, जयंत काळे पाटील, भैय्याराज गोसावी, वसिम सय्यद, गणेश वाळुंजकर, संतोष जमदाडे, विवेक अवसरे, महीला आघाडीच्या राजश्री खाडे, चंपावती कांबळे, पुजा माने, भैय्या कुंभार, गणेश झाकणे, शिवकुमार चिवटे, शिवाजी कुंभार यांच्यासह राजू सय्यद यांचा मित्रपरिवार व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .