कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या स्मृतीदिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर व उगले महाराज यांचे हरिकिर्तन
करमाळा प्रतिनिधी : कामगार नेते, गोरगरीबांचे कैवारी, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व हमाल पंचायतचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या १० व्या स्मृतीदिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीर, ह.भ.प. पांडूरंग महाराज उगले यांचे हरिकिर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत एकदंत मंगल कार्यालय करमाळा-जामखेड रोड, करमाळा येथे संपन्न होणार आहे. स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. तरी या पुण्यतिथीच्या – कार्यक्रमास व रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवून नागरीकांनी आदरांजली अर्पण करण्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे; असे आवाहन हमाल-पंचायतच्या वतीने अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी केले आहे.
