टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबीर
करमाळा प्रतिनिधी
टायगर ग्रुप चे अध्यक्ष डॉ. पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती टायगर ग्रुप च्या संयोजकांनी दिली आहे.टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे शुक्रवारी दि, 29 ऑक्टोबर रोजी दत्त मंदिर येथे सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर भव्य रक्तदान शिबिराचे उद्घघाटन वैद्यकीय अधिक्षक डॉ अमोल डुकरे हे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष करमाळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा भोंडवे हे असून प्रमुख अतिथी म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे सर्व पत्रकार बाांधव उपस्थित राहणार आहेत.सदरच्या कार्यक्रमाला करमाळा शहर व तालुक्यातील असंख्य नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून रक्तदान करावे असे आवाहन टायगर ग्रुप च्या वतीने टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांनी केलेे आहे.
