करमाळा

प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध दाखले मिळण्यासाठी दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज केतुर १ येथे कॅम्पचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी प्रा. रामदास झोळ फाऊंडेशनच्या तर्फे महाराजस्व अभियाना अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध दाखले मिळण्यासाठी कॅम्पचे आयोजन दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यू. कॉलेज केतुर नं १ या ठिकाणी करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे मिळवण्यासाठी खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन चे सर्वेसर्वा आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री राणादादा सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून सदरचा कॅम्प बुधवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे . या कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमीसाईल,नॉन क्रिमीलेयर, ई. डब्ल्यू. एस., नावात किंवा जन्म तारखेत बदल इत्यादी दाखले मिळणार आहेत. तरी परिसरातील सर्व गरजू पालक व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर आणि संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री राणादादा सूर्यवंशी साहेब यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group