आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक सदस्यपदी महेश चिवटे संजय गुटाळ यांची नियुक्ती
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक बाळासाहेब बेंद्रे यांच्यानंतर आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे व संजय गुटाळ यांची प्रशासक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी दिले आहे. ‘हा कारखाना सक्षमपणे सुरू करण्यासाठी सावंत गटाच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे सांगितले . सोनारी येथे त्यांनी हे पत्र स्वीकारले आहे़. आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाणार असल्याचे महेश चिवटे यांनी सांगितले.
