Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

मकाई साखर कारखाना निवडणुकीत उच्च न्यायालयामध्ये विरोधकाचे अपील फेटाळल्याने बागलगटाची सरशी

 

करमाळा प्रतिनिधी श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी सोपानराव टोपे यांनी एकवीस अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते.‍या निर्णयाविरुद्ध प्राध्यापक रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथील प्रादेशिक सह संचालक (साखर) यांच्याकडे एकवीस उमेदवारी अर्जावर अपील दाखल केले होते.सोपानराव टोपे यांनी अवैध ठरवलेले अर्ज प्रादेशिक सहसंचालक राजकुमार दराडे यांनी अवैध ठरवले होते यामुळे बागल गटाला दिलासा मिळाला होता. याबाबत मकाई बचाव समितीचे रामदास झोळ सर यांनी आपण मंजूर झालेल्या पात्र उमेदवारांना बरोबर घेऊन निवडणूक लढवणार असून अपात्र ठरलेल्या उमेदवाराबाबत उच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका जाहीर केली उच्च न्यायालयामध्ये त्यांचे अवैध अर्जाचे अपील फेटाळले असून बागल गटामध्ये यामुळे आनंदाची वातावरण आहे .उर्वरित पात्र उमेदवारांना घेऊन प्राध्यापक रामदास झोळ सर सहकाऱ्यांसह निवडणूक लढवणार का विरोधकांना बेरजेचे राजकारण करून बागल गट निवडणूक बिनविरोध करणार यासंबंधी जोरदार हालचाली सुर आहेत.आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून विरोधक काय भूमिका घेतात यावर या निवडणुकीची चित्र अवलंबून असून सध्या तरी बागल गटाने आपले वर्चस्व सिद्ध करत बहुमताचा आकडा गाठला असल्याने बागल गटाची सत्ता मकाई सहकारी साखर कारखान्यावर कायम येणार असल्याचे स्पष्ठ झाले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group