Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

श्री देवीचामाळ ग्रामपंचायत विकास कामात अग्रेसर!!

करमाळा प्रतिनिधी
श्री देवीचामाळ ग्रामपंचायतीच्या वतीने मागील पाच वर्षात गावातील जी विविध विकासकामे झालेली आहेत त्याचा आदर्श इतर गावांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन विस्तार अधिकारी तथा ग्रामपंचायत नुतन प्रशासक आदिनाथ आदलींगे यांनी केले.
विद्यमान ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच तसेच सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्या बद्दल ग्रामपंचायत कार्यालयात निरोप समारंभ संपन्न झाला या वेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच सौ. स्वातीताई फुलारी यांनी पाच वर्षात गावातील लोकांनी तसेच सदस्यांनी केलेल्या सहकार्यामुळे पाठपुरावा करून राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून कमलाभवानी मंदिर ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करण्यात येवून त्यामध्ये ऐतिहासिक ९६ पाय-या ची बारवेसाठी तसेच तीर्थकलौळ तळ्यासाठी सुरक्षा कंपौंड, मंगल कार्यालय, भक्त निवास, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र ३६ संडास व बाथरूम गावातील रस्ते काॅंक्रिटीकरण अशी पावणेदोन कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत.
गावातील पाणी पुरवठा उन्हाळ्यात अपुरा पडत असल्याने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून मांगी तळ्याचे खालील बाजूस विहीर खोदकाम करून पाईप लाईन द्वारे गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सोय होणे साठी ८०लाख रुपयांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे अशी माहिती उपसरपंच अनिल बापू पवार यांनी दिली आहे.
गावातील उघड्या गटारी बंदिस्त करून पाईप लाईन द्वारे प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर स्वतंत्र चेंबर बांधून ९० टक्के गाव गटार मुक्त झाले असल्याचे ग्रामसेवक आबासाहेब शिंदे यांनी सांगितले.या कामामुळे गाव स्वच्छ व सुंदर होणार असल्याचे राजाभाऊ फलफले यांनी सांगितले.यावेळी ग्रामपंचायत सदस्यां रेखाताई चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक शाळेसाठी व अंगणवाडी साठी खेळणी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे अशी माहिती दिली.तसेच ग्रामपंचायत कार्यालय सुशोभीकरण गल्लीतल्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लाॅक बसविण्याचे काम केले असून यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थिती वर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावांमधील लोकांना हॅन्डवाॅश वाटप करण्यात येवून दोन वेळा गावांमध्ये जंतूनाशक औषध फवारणी करण्यात आली आहे.
या निरोप समारंभासाठी नुतन प्रशासक आदिनाथ आदलींगे श्रीराम फलफले, राजाभाऊ फलफले, सरपंच सौ स्वातीताई फुलारी उपसरपंच अनिल बापू पवार ग्रामपंचायत सदस्या सौ. रेखाताई चव्हाण, रूपाली चांदगुडे, रोहीनीताई सोरटे,माधूरी सोरटे, विद्याराणी थोरबोले, मोहन फलफले, संजय मोरे यांच्यासह ग्रामसेवक आबासाहेब शिंदे, बापूराव चांदगुडे, तुकाराम सोरटे, भाऊसाहेब फुलारी, भाऊसाहेब सोरटे, दिपक थोरबोले, प्रभु फलफले,जयराम सोरटे बांबू सोरटे, अमोल सोरटे, हनुमंत फलफले, मारुती सुरवसे, इत्यादी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group