मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीकडून युवा नेते दिग्विजय बागल यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर
करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभेची महायुती मधील जागा शिवसेनेला जाहिर झाली असून बागल गटाचे युवा नेते मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर त्यांना एबी फार्म देण्यात येणार आहे.दिग्विजय बागल यांनी सोमवारी अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला होता.परंतु करमाळ्याची जागा शिवसेनेची असल्या कारणाने या जागेवर प्रबळ असणारा गटाचे उमेदवाराची निवड होणे अपेक्षित होते. त्यामुळे बागल गट हा करमाळा तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रबळ असणारा गट असल्याने दिग्विजय बागल यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे.
मार्गदर्शक विलासराव घुमरे सर भगिनी सौ रश्मी दीदी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती मधूनही दिग्विजय बागल यांना मोठें पाठबळ मिळाले आहे. युवा नेते दिग्विजय बागल धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिग्विजय बागल यांनी सहकार्यासह शिवसेनेत प्रवेश केला .
यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे संपर्कप्रमुख रवींद्र आमले मार्गदर्शक विलासराव घुमरे सर मकाईचे संचालक आशिष गायकवाड आदिनाथ कारखान्याचे चेअरमन श्री. धनंजय डोंगरे मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ,श्री सतीश बापूं निळ, श्री. राजेंद्र मोहल्कर कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा माजी संचालक श्री. देवानंद ढेरे, मकाई साखर कारखान्याचे मा. संचालक श्री. नंदकुमार भोसले आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते.दिग्विजय बागल यांना उमेदवारी मिळाल्यामुळे बागल गटामध्ये व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे आनंदाचे वातावरण पसरले आहे.
