माजी गृहराज्ममंत्री रमेश दादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने अन्नदान
करमाळा प्रतिनिधी
माजी गृहराज्यमंत्री,महाराष्ट्र राज्यचे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.रमेश दादा बागवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मातंग एकता आंदोलन करमाळा शहर व तालुका व स्व.नामदेव जगताप युवा मंच च्या वतीने करमाळा शहरातील राशीन पेठेतील श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेत गोर-गरीब वृद्ध निराधारांना जेवण वाटप करण्यात आले. यावेळी करमाळा तालुकाध्यक्ष शरद भैय्या पवार ,युवाअध्यक्ष युवराज नामदेव जगताप ,युवक तालुकाध्यक्ष दत्ता चव्हाण, जिल्हाउपाध्यक्ष रतन शिंदे शहराध्यक्ष नितीन आलाट, संघटक अभिजीत मंडलिक उपस्थित होते.
