Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांचा वाढदिवस करमाळा येथे वृक्षारोपण, रक्तदान शिबीराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी- भटके विमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष, भटक्या जमाती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्या वाढदिवसानिमित्त युवा एकलव्य प्रतिष्ठान, एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा यांच्या वतीने तीस व एकतीस ऑगस्टला विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

माने यांचा एकतीस ऑगस्टला साठावा वाढदिवस असून त्या निमित्ताने तीस ऑगस्टला एकलव्य आश्रमशाळा येथे सकाळी अकरा वाजता साठ वृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी गोपाळ सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण शुभारंभ करण्यात येणार असून यावेळी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. बाबुराव हिरडे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर, डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील, प्रा. नागेश माने, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, डॉ. श्रीराम परदेशी, विवेक येवले, भारत जाधव, सचिन साखरे, बाळासाहेब गोरे, विजय देशपांडे, बिभीषण जाधव, नितिन दोशी, पत्रकार अशपाक सय्यद, नारायण पवार, शकील बागवान, धनंजय शिंदे, काकासाहेब काकडे आदि उपस्थित राहणार आहेत.

तर एकतीस ऑगस्टला एकलव्य आश्रमशाळा येथे सकाळी अकरा वाजता माने यांचा सन्मान कार्यक्रम होणार असून अकरा ते पाच या वेळेत सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. तसेच त्यावेळी डॉ. गणेश राऊत, डॉ. अक्षय अडसूळ, डॉ. राहूल जाधव यांच्या सहकार्याने आरोग्य व फिजिओथेरपी शिबिर पार पडणार आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक कन्हैयालाल देवी यांच्या हस्ते होणार असून भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे हे अध्यक्ष असणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी जाधव, नगरसेवक संजय सावंत, डॉ. रोहन पाटील, डॉ. बाबुराव लावंड, डॉ. तुषार गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष वारे, सिकंदर जाधव, नगरसेवक प्रविण जाधव, विनय ननवरे, ॲड. नवनाथ राखुंडे, सरपंच आशिष गायकवाड, पै. अफसर जाधव, ॲड. सुनिल घोलप, सुभाषराव जाधव, पत्रकार विशाल घोलप, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे आदि उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी ॲड. संग्राम माने, युवा एकलव्य प्रतिष्ठान, एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा, एकलव्य परिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group