दिवाळीच्या अगोदर सरसकट एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा -सुनिल भोसले
करमाळा प्रतिनिधी..
दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये कोविड सेंटरवर करोडोंच्या पटीने सेंटरला खर्च केला होता त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट पन्नास हजार जमा करावेत अशी मागणी भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले यांनी केली आहे, सध्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने कोरोनावर प्रत्येक जिल्हा, तालुका वाईज खर्च केला होता त्याच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, सदरची उदभवलेली परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे
ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी,
महाराष्ट्र राज्यामध्ये जून महिन्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये ठिकाणी अतिदृष्टी पाऊस झाला या पावसामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये भयंकर स्वरूपाचे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यामुळे दिवाळी सण साजरी होणार नाही, त्यांची संपूर्ण पिके पाण्यामध्ये गेल्यामुळे खर्चाचा मोठा डोंगर डोक्यावर उभा राहिल्याने महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष कोविड सेंटरवर लाखोच्या पटीने खर्च केला होता त्याच पटीने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा खर्च करावा, अशी मागणी भिमदल संघटनेने प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे..
