मकाई सहकारी साखर कारखान्याला ऊस घालुन सहकार्य करावे – दिग्विजय बागल ऊसाची मोळी गव्हाणीत पडली मकाई साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु
करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखाना यंदाच्ता वर्षी चार लाख टन ऊस गाळप करणार असून. शेतकरी सभासदांनी मकाई सहकारी साखर कारखान्यास ऊस घालून सहकार्य करावे असे आवाहन दिग्विजय बागल यांनी केले आहे. तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचा सोमवारी ऊसाची मोळी टाकून हंगामाची सुरुवात करण्यात आली. मकाई कारखान्याला गेल्या हंगामात सर्वाधिक गाळपासाठी ऊस दिलेल्या २५ शेतकऱ्यांच्या हस्ते मोळी टाकून हा हंगाम सुरु करण्यात आला. यावेळी त्यांचा फेटेबंधून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह उपस्थित सर्व संचालक इतर ऊसउत्पादक शेतकऱ्यांबरोबर खाली बसले होते. तर २५ मान्यवर शेतकरी व माजी आमदार शामलताई बागल मंचावर होत्या. तालुक्यात कमलाई, भैरवनाथ शुगर, मकाई व आदिनाथ या साखर कारखान्यांपैकी यावर्षी मकाई कारखान्याच्या गव्हाणीत पहिली मोळी पडली आहे.यावर्षी मकाई सहकारी साखर कारखाना वेळेत सुरु झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारखान्याची अतंर्गत कामे वेळेत पूर्ण करून हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना सज्ज झाला आहे. यावर्षी गाळप क्षमेतमध्ये वाढ करून कारखान्याने ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या हंगामात कारखान्याने साधारण तीन लाख १६ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते.
अत्यंत अडचणीतून गेल्यावर्षी हा कारखाना सुरु झाला होता. कारखान्याने ३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप उद्दिष्ट ठेवलेले असताना शेवटच्या काळात गाळपाअभावी ऊस शिल्क राहण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे कमी गाळप होत असताना कारखाना तोट्यात जात असतानाही शेतकऱ्यांचे हित पाहून तालुक्यातील ऊस गाळप केला.यावर्षी शिल्क राहिलेली देणी कारखाना सुरळीत सुरु झाल्याबरोबर तातडीने देण्यात येणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बागल यांनी दिली आहे. हा हंगाम ऊसउत्पादक शेतकरी व कामगार, वाहतूकदार यांच्या मदतीने यशस्वी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पांढरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक हरीशचंद्र खाटमोडे, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष केरू गव्हाणे, मांजरगावचे माजी सरपंच साधना खरात, संचालक संतोष पाटील, नंदकिशोर भोसले आदी उपस्थित होते.कारखान्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम या रामचंद्र हाके, उत्तम पांढरे, बाबासाहेब घरबुडवे, राजेंद्र बागल, सचिन जगताप, बाळासाहेब निंबाळकर, अरविंद सरडे, विजयसिंह हाके पाटील, हेमंत घरबुडवे, सदाजी जगदाळे, सुनील सरडे, शशिकला सुरवसे, नितीन पाटील, भाऊसाहेब सरडे, श्रुती पाटील, अरुण माळी, काकासाहेब सरडे, अशोक आमनेर, आदिनाथ गायकवाड, दादासाहेब पवार, गोरख भोगे, उद्धवराव सरडे व इम्रान शेख या पंचवीस ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली आहे.