Wednesday, April 23, 2025
Latest:
Uncategorized

सौ. ऋतुजा शिवकुमार चिवटे (हिंगमिरे)यांनी मिळवलेले यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी-पत्रकार दिनेश मडके

करमाळा प्रतिनिधी जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येते सौ. ऋतुजा शिवकुमार चिवटे(हिंगमिरे)यांनी पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे मत करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश मडके यांनी व्यक्त केले. करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या वतीने सौ.ऋतुजा शिवकुमार चिवटे (हिंगमिरे) यांची ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सौ.सुवर्णा दिनेश मडके यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की सौ.ऋतुजा शिवकुमार चिवटे यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत लग्न झाल्यानंतर पाच वर्षांनी परीक्षा देऊन हे यश मिळवले आहे. त्यांनी मिळवलेले यश हे नक्कीच ‌ कौतुकास्पद असून ‌त्यांच्या या यशामध्ये पती शिवकुमार‌ चिवटे सासू,सासरे,आई वडील तसेच दिर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे मा.कक्षप्रमुख मंगेश चिवटे,सोलापूर शिवसेना(शिंदे गट)जिल्हाप्रमुख महेश(दादा)चिवटे व भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश(भाऊ) चिवटे यांचे विशेष सहकार्य लाभले असून तसेच संपूर्ण चिवटे कुटुंबाचे मोलाचे योगदान लाभले आहे. ‌या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार, करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सचिव नरेंद्रसिंह ठाकुर, उद्योजक शिवकुमार चिवटे, सिध्देश्वर डास आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ.ऋतुजा शिवकुमार चिवटे (हिंगमिरे) यांनी सांगितले की चिवटे परीवाराचा समाज सेवेचा चा वारसा करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सचिव नरेंद्रसिंह ठाकुर यांनी केले व आभार‌ सिद्धेश्वर ढास यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group