Uncategorized

कोर्टीत सौर ऊर्जा प्रकल्प न झाल्यास कोर्टी ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा नागेश जाधवचा इशारा

कोर्टी प्रतिनिधी कोटी गावात सौर उर्जा प्रकल्प होत असून सदर प्रकल्पातून गावाचा मोठा विकास होणार आहे .सदर सौर ऊर्जेची वीज 33/11के वी कोर्टी सबस्टेशनला जोडण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे गावात सर्व शेतवर्गाचा वीजेचे प्रश्न सुटणार आहे, भर उन्हाळ्यात वीजेचा प्रश्न हा सुटणार आहे. शेतकरी वर्गाचे जे विजेमुळे होत असलेले हाल रात्रपाळीत वीजेचे हाल होत असून सौर उर्जा प्रकल्प झाल्यानंतर हे हाल होणार नाहीत. सौर ऊर्जा प्रकल्पातून ग्रामपंचायतला व्यवसाय कर मिळणार आहे आणि त्यामधून विकासाला गती मिळणार आहे या प्रकल्पाच्या अनुसंगाने गावात मोठे कंपनी मोठे उद्‌योग गावातील गरजु लोकांना रोजगार मिळतील,  उद्योगधंदे गावात येतील व सदर सौरउर्जा प्रकल्प न झाल्यास गावाचे भविष्याच्या दृष्टीने मोठे नुकसान होईल, तरी सदर सौर उर्जा प्रकल्प रद्द होऊ नये म्हणून लवकरच व शिष्ठमंडळ ऊर्जामंत्री व महसूलमंत्री यांना भेटून निवेदन देणार असल्याचे नागेश जाधव यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!