Friday, September 18, 2026
Latest:
Uncategorized

एकलव्य आश्रमशाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रेक्षकांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात साजरे झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे प्रेक्षकांनी कौतुक केले.या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेचे संस्थापक – अध्यक्ष रामकृष्ण माने हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विनोद घुगे, ग्राम सुधार समितीचे तालुकाध्यक्ष ऍड. बाबुराव हिरडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे – पाटील, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव गणेश कराड, डॉ. गणेश राऊत, पोलिस उपनिरीक्षक बिभीषण जाधव, उद्योजक संतोष कुलकर्णी, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके, देवळालीच्या सरपंच अश्विनीताई शिंदे, धनंजय शिंदे, सिद्धार्थ वाघमारे, नरेंद्रसिंह ठाकुर, नागेश चेंडगे, गोरख पवार, कृष्णा भागवत, श्रेयस खडके, सुयश खडके, सुयश शिंदे, अथर्व घाडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या वतीने स्वातीताई माने, ऍड. संग्रामदादा माने, मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे, अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी उपस्थितांचे सन्मान करुन स्वागत केले. यावेळी बोलताना रामकृष्ण माने यांनी, शाळेच्या वाटचालीची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी कार्यरत असल्याचेही स्पष्ट केले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक घुगे यांनी शिक्षणाशिवाय विकास होवू शकत नाही. त्यामुळेच समाजातील दुर्लक्षीत घटकातील मुलांसाठी आश्रमशाळेच्या माध्यमातून शिक्षण सेवा देण्याचे कार्य खूप महत्वाचे असल्याचे सांगितले. तर ऍड. हिरडे यांनी माने दांम्पत्याच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. यावेळी करे – पाटील यांनी एकलव्य आश्रमशाळेतील उपक्रम नेहमीच उल्लेखनीय असतात. विद्यार्थ्यांना ज्ञानदान देतानाच सर्वांगीण विकासासाठी होणारे पर्यटन कौतुकास्पद आहेत असे स्पष्ट केले. तर कराड यांनी आश्रमाशाळेच्या प्रगतीसाठी नेहमीच सहकार्य करु. असे आश्वासन दिले.यावेळी आयोजित कार्यक्रमात आश्रमशाळेतील मुला, मुलींनी आदिवासी, शेतकरी, देशभक्ती, लावणी, गवळणी अशा विविध गीतांवर बहारदार अशी समूहनृत्ये सादर केली. त्यांच्या नृत्यांनी तसेच विनोदी नाटिकानी उपस्थितांची दाद मिळविली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशोरकुमार शिंदे यांनी केले. आभार विठ्ठल जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्कर वाळुंजकर, विद्या पाटील, कुमार पाटील, विलास कलाल, प्रल्हाद राऊत, उमेश गायकवाड, सैदास काळे, वदंना भालशंकर, दिपाली माने यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!