संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत उद्योजक विजय दादा पवार यांचे कार्य प्रेरणादायी – नरेंद्रसिंह ठाकुर*
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये विजयदादा पवार यांनी संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत सामाजिक चळवळीत योगदान देण्याचे काम केले असून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सचिव नरेंद्रसिंह ठाकुर यांनी केले यांनी व्यक्त केले.
यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश मडके उद्योजक शिवकुमार चिवटे, सिद्धेश्वर डास उपस्थित होते.करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्यावतीने विजय दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना नरेंद्रसिंह ठाकुर म्हणाले की विजयदादा पवार यांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्पेअर पार्ट दुकानापासून सुरुवात करून त्यानंतर जे सी बी, पोकलेन जे के टायर एजन्सी अशा व्यवसायामधुन उत्कर्ष केला.सामाजिक बा़धिलकीतून मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे . तसेच शैक्षणिक क्षेत्रात रणजितसिंह मोहिते पाटील महाविद्यालय स्थापना करून करमाळयातील होतकरू विद्यार्थ्यांना बी सी ए.बी.बी ए बी एससी कोर्स चालू केले.त्याचप्रमाणे राजकारणामध्ये. लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या बरोबर काम केले आहे.याचबरोबर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बरोबर काम करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम केले.त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष म्हणून काम केले. हे काम करताना कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाबीजवर संचालकपदी निवड केली होती. राजकारणात सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे .कुणाच्या छत्राखाली काम करण्यापेक्षा स्वाभिमानाने आत्मनिर्भर तिने गोरगरिबाची कामे स्वबळावर करण्यासाठी दादा सदैव कार्यरत राहिले आहे.त्यानी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सर्व जाती धर्माचे मित्रपरिवारावर त्यांचे प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विजयदादाचे जवळचे नातेसंबंध मित्रत्वाचे संबंध आहे. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.अनेक लोकांची निस्वार्थपणे कामे त्यांनी केली आहेत त्यांचे कार्य करमाळा तालुक्यातील जनतेसाठी व पिढीसाठी प्रेरणादायी आहे. स्वाभिमानी प्रामाणिकपणे काम करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिल्यास समाजाचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही असे मत.नरेंद्रसिंह ठाकुर यांनी व्यक्त केले.. यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शैक्षणिक सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून फोन मेसेज सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
