चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सारथीअंतर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या विकासाठी तसेच सारथी साठी आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या बैठकीत देखील त्यानीं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल आहेत. मागील बैठकीत देखील स्व. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळींच्या माध्यमातून मराठा समाजातील उद्योजकांना दिलासा देण्यासाठी योजनांमध्ये बदल करून युवकांना अधिक लाभ कसा होईल यासाठी मोठे सकारात्मक बदल करण्यात आले होते.
सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीत घेतलेले मराठा विद्यार्थ्यांसाठीचे निर्णय पुढीलप्रमाणे :-
१. सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार निकषानुसार मराठा विद्यार्थ्यांना एससी/ एसटी/ ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला ६० हजार परुपये निर्वाह भत्ता.
२. केंद्र सरकारच्या एनसीईआरटी मार्फत शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण व शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना वार्षिक ९,६०० रुपये छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरु.
३. डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजनेअंतर्गत पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपर्यंत असणाऱ्या आणि राज्यबाहेरील २०० नामांकित विद्यापीठ / संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ.
४. या योजनेअंतर्गत अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्याकरिता ५०,००० रुपये देण्यात येतील.
५. विद्यापीठाने निर्धारित केलेल्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी प्रतिपूर्ती आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व भोजन शुल्क रक्कम अदा करता येईल.
६.मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे पदव्युत्तर, पदवीसाठी दरवर्षी ३० लाख आणि पीएचडी साठी ४० लाख रुपयांच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरु.
