Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

विकास कामांची स्पर्धा असणे ही करमाळा तालुक्यासाठी चांगली बाब आहे.. परंतु राजकारणासाठी विकास कामात अडथळे आणण्याची शर्यत असु नये- ॲड अजित विघ्ने

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचा सर्वांगिण विकास करणे ही संकल्पना अतिशय महत्वपुर्ण असुन, यासाठी प्रत्येकानेच आपआपल्या माध्यमातुन कार्यरत राहीले पाहीजे.. उद्योगधंदे, व्यवसाय याबरोबरच शिक्षण, आरोग्य, विज, पाणी, रस्ते आणि विविध माध्यमातुन करमाळा तालुक्याचा विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवुन प्रत्येकानेच काम केले पाहीजे. आपल्या तालुक्याचे सिंचनाचे क्षेत्र वाढत आहे.. रस्त्याची कामे चालु आहेत.. आरोग्याच्या दृष्टीने दवाखाने सक्षम होत आहेत, विजेच्या समस्यांवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नविन३३ केव्ही सबस्टेशन सह वाढीव ट्रान्सफार्मर व इतर कामे प्रगतिपथावर आहेत. दहीगाव ऊपसा सिंचन च्या वाढीव सुप्रमा सहीत कुकडीचे आवर्तन घेण्यातही यशस्वी झालेलो आहोत, वैयक्तिक लाभाच्या योजनांमधुन ग्रामिण भागातील हजारो लोकांना विविध योजनांचा लाभ आमदार कार्यालयाचे सहकार्याने मिळवुन दिलेला असुन,*आमदार आपल्या दारी* सारखा प्रयोग संपुर्ण तालुक्यात राबवुन गोरगरीब तसेच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम करण्यात आलेले आहे. जरी दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना ची महामारी आलेली असली, तसेच सरकारची परिस्थिती बदलली असली तरी विकास कामांचे योग्य ते नियोजन केल्यामुळे अनेक अडथळ्यांवर मात करून निरंतरपणे विकास कामे चालु आहेत, तालुक्याच्या अनेक भागातील रखडलेले अनेक प्रश्न भविष्यकाळातही नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लागतील याचा विश्वास असुन, *करमाळा तालुक्याला एक संयमी आणि आश्वासक चेहरा आमदार संजयमामांच्या रुपाने मिळाला आहे.* गटा-तटाच्या राजकारणात गुरफटलेली मंडळी आता हातात हात घालुन विकासाच्या वाटेवर चालु लागली आहेत.. खाजगी कारखान्यांबरोबरच सहकारी साखर कारखाने करमाळाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वरदान ठरत असुन, *मकाई आणि आदिनाथ साखर कारखान्याबाबत  कामगार, शेतकरी बोलु लागले आहेत.* करमाळा तालुक्यात नेहमीच घडणारे दबावाचे, दहशतीचे राजकारणाला आता भिक न घालता आमदार. संजयमामा शिंदे यांना प्रत्येक नागरिक भेटत असुन आपल्या प्रश्नांची सोडवणुक करून घेत आहे.. करमाळा, कुर्डुवाडी नगरपरिषदांना भरघोस निधी दिलेला असुन कामे प्रगतिपथावर आहेत. श्री. कमलादेवी मंदीर, देवीचा माळ, करमाळा व अनेक मंदीरांना निधी दिलेला आहे… तसेच पर्यटनाचे दृष्टीने देखिल करमाळा तालुक्यात वाव असल्या कारणाने पर्यटन क्षेत्र वाढवणे व त्या माध्यमातुन उदयोग व्यवसायाला चालना देण्याचे निश्चित धोरण असुन, करमाळा तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचे नियोजन केलेले आहे.. चालु वर्षी पाऊस खुप जास्त प्रमाणात झालेला असुन, शेती, रस्ते खराब झालेले आहेत.. त्यामुळे पिकांचा नुकसानीचे पंचनामे तातडीने करणेबाबत च्या सुचना शासनाला केलेल्या असुन, रस्त्यांसाठीचा निधी उपलब्ध करून डागडुजीची कामे चालु केली आहेत.. तालुक्याच्या कोणत्याही नागरिकांना त्याचा पक्ष, पार्टी, गट, तट न विचारता त्याचे कामाची योग्य पद्धतीने सोडवणुक करण्याचे काम आमदार संजयमामा शिंदे हे करीत असुन, आगामी कालावधीत उर्वरीत राहीलेले प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे काम होणार आहे… तालुक्याच्या प्रत्येक गावात बैठका, लग्न समारंभ, दुःखद प्रसंगाचे वेळी देखिल आमदार साहेब स्वतः उपस्थित राहत असुन, *तालुक्याचे प्रत्येक गाव आणि गावकरी यांना विकासाचे प्रक्रीयेत आणण्यासाठी *गाव भेट* दौरा करण्याचे नियोजन केलेले आहे.. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदापासुन आजपर्यंत करमाळा तालुक्याला विविध माध्यमातुन भरघोस निधी दिलेला असुन, ही विकासाची प्रक्रीया आता थांबणार नाही.. आमदार संजयमामा शिंदे यांनी ज्या ज्या योजनांना मंजुरी मिळवली आहे, त्या होतीलच, आज मामांनी अनेक मंजुर असलेल्या स्थगित प्रकरणांचा पाठपुरावा करून स्थगिती ऊठविली आहे.. आपल्या सर्वांचे जिव्हाळ्याचा *डिकसळ पुल* याचीही स्थगिती उठवली असुन.. कृपया मामांच्या विरोधात काहीही लिहुन गैरसमज पसरविणाऱ्या साठी ही चपराक आहे. अशा लोकांनी साथ द्यावी, अडथळे आणु नयेत हीच विनंती.. करमाळा तालुक्याचा विकासाचा आलेख ऊंचावत आहे आणि ऊंचावत राहील…. 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group