Friday, April 25, 2025
Latest:
Uncategorized

मांगी एमआयडीसीमध्ये एक कोटी 79 लाखाच्या पाणीपुरवठा योजनेचा कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

करमाळा प्रतिनिधी

गेल्या पंचवीस वर्षापासून रखडलेल्या करमाळा तालुक्यातील मांगी येथील एमआयडीसी मध्ये आता प्लॉट वाटप सुरू झाले असून
या नवीन लघु उद्योजकांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी 79 लाख रुपयाचे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आज शिवसेना जिल्हाप्रमुख महेश शेठ चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला.व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते दिग्विजय बागलविद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे,यश कल्याणी संस्थेचे चेअरमन गणेश करे पाटील,भाजपचे सरचिटणीस गणेश चिवटे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे,माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडेशहर प्रमुख संजय शीलवंत उपतालुकाप्रमुख चंद्रकांत राखुंडेपत्रकार नासीर कबीर अशोक नरसाळे,एमआयडीसी संचालक आर आर पाटील,फुलकुमार शहा,ऑइल उद्योजक लक्ष्मणसुपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने या पाणीपुरवठा योजनेला हा निधी मिळाला असून पाच पाच गुंठ्याचे 40 प्लॉट पाडण्यात आले आहे.736 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे हे प्लॉट उपलब्ध असून इच्छुक उद्योजकांनी ऑनलाइन ने ह्या प्लॉट घ्यावेत.पाच गुंठ्यापासून 20 एकरा पर्यंत हे प्लॉट आहेतस्वर्गीय दिगंबरराव बागल यांनी ही एमआयडीसी उभी करण्यासाठी पंचवीस वर्षांपूर्वी प्रयत्न केले होते.आता ते काम सुरू झाल्याबद्दल दिग्विजय बागल यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group