आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून वाशिंबे येथील विविध विकास कामांकरिता 25 लाख रुपये निधी मंजूर-सरपंच तानाजी बापु झोळ
प्रतिनिधी वाशिंबे
वाशिंबे ता.करमाळा येथे २०२३-२४अर्थिक वर्षातील लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मुलभूत सुविधा २५१५ या योजने अंतर्गत आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नाने शरदचंद्रजी पवार विद्यालय ते रामचंद्र पाटील वस्ती रस्ता खडीकरण करणे यासाठी ५ लाख. रेल्वे नाला ते भैरवनाथ मंदीर रस्ता 5लाख रुपये,रेल्वे लाईन ते संजय गायकवाड वस्ती 5लाख रुपये, मुस्लिम बांधव समाज मंदीर 10लाख रुपये असे एकूण 25लाख रुपये निधी मंजूर झाला असुन येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष या कामांस सुरुवात होईल अशी माहिती वाशिंबे ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी झोळ यांनी दीली.
यावेळी झोळ यांनी बोलताना सांगितले की आमदार संजयमामा शिंदे यांच्या कडे राजुरी चढ फोडने, वाशिंबे ते चौफूला ते गोविंदपर्व कारखाना डांबरीकरण,टाकळी ते डीकसळ पूल रस्ता रुंदीकरन,जिंती चौक ते कात्रज ते कात्रज रेल्वे स्थानक रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेत समाविष्ट करणे,पोमलवाडी ते केतूर-पारेवाडी-सावडी फाटा डांबरीकरण, राजुरी ते पोंधवडी रस्ता डांबरीकरण यांसह परिसरातील विविध विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू आहे.यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात येनार असून लवकरच सकारात्मक व ठोस निर्णय समोर येतील.वाशिंबे सह इतर गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होतील.तसेच या योजनेमुळे गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.दुरुस्तीची कामे ही हाती घेतली जाणार आहेत.२५ लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल आमदार संजयमामा शिंदे यांचे वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानले आहेत.
