Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासहकार

आदिनाथने कारखान्यावर कृपा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब येणार करमाळा नगरी त्यांच्या स्वागताची कार्यक्रमाची प्रशासनाच्यावतीने जोरदार तयारी

करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी आज प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी करून नियोजना संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या

या बैठकीसाठी माजी आमदार नारायण आबा पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे तालुका प्रमुख देवानंद बागल आदिनाथ साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे  संचालक हरिदास डांगे रमेश कांबळे संचालक नितीन जगदाळे नाना लोकरे युवा सेनेचे निखिल चांदगुडे राहुल कानगुडे विशाल गायकवाड नागेश गुरव आजिनाथ वस्ताद आदी पदाधिकारी उपस्थित होते

स्थळावर असलेले हेलिपॅड व व्यासपीठा संदर्भातील योग्य त्या सूचना पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल हिरे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिल्या महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार समीर माने यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली

 कारखान्यावर दहा हजार जनसमुदाय बसेल एवढा सभा मंडपाची तयारी सुरू केली असून

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेबांचे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आदिनाथ कारखान्याचे सर्व संचालक कर्मचारी काम करत असल्याचे दिसून येत आहे तालुक्यातील जनतेने उपस्थित राहून मुख्यमंत्र्यावरील प्रेम व्यक्त करावे …जिल्हाप्रमुख महेश चिवटे 

आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रो च्या तावडीतून काढून सर्वसामान्य सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांची महत्त्वाची भूमिका ठेवली आहे आदिनाथ कारखान्याचा मुळी टाकण्याचा होणारा कार्यक्रम हा करमाळा तालुक्याच्या इतिहासातला परिवर्तन करणारा दिवस आहे तरी या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी कामगार कष्टकरी मजूर शेतकरी मजूर व सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपण सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत हे दाखवून देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे

हरिदास डांगे आदिनाथ बचाव समिती

आदिनाथ बचाव समितीने हा लढा उभा केल्यानंतर अनेकांना हे अशक्य वाटत होते पण आदिनाथ महाराजांच्या कृपेने राज्यात सरकार बदलले एकनाथाच्या रूपाने तालुक्याला नाथ मिळाला

व प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या रूपाने आदिनाथ साठी परीस मिळाला यांच्या सहकार्य आशीर्वादामुळे हा कारखाना सुरू होत आहे व हा कारखाना कायमस्वरूपी सहकाराच्या मालकीचाच राहावा शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहावा ही सभासदांची इच्छा आदिनाथ महाराजांनी पूर्ण केली आहे अशी भावना कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी व्यक्त केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group