हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत डॉ.महेश भोसले दांम्पत्याचे अभूतपुर्व यश
करमाळा (प.प्र.) : सातारा येथे पारपडलेल्या हिल हाफ मॅरेथॉन या प्रतिष्ठीत धावण्याच्या स्पर्धेत करमाळा शहरातील
तज्ञ डॉ. महेश भोसले व डॉ. अपर्णा भोसले यांनी अभूतपुर्व यश संपादन केले. आव्हानात्मक मार्ग, कठीण चढ आणि दमछाक करणारे अंतर पार करत त्यांनी संपूर्ण शर्यत पूर्ण केली. करमाळा तालुक्यातून ही मॅरेथॉन पूर्ण करणारे पहिले वैद्यकिय दाम्पत्य म्हणून त्यांनी इतिहास रचला असून, परिसरातीलतरूणाईसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. या यशाबद्दल डॉ. भोसले दाम्पत्याचे वैद्यकिय क्षेत्रातून विशेष कौतूक केले जात आहे.


