सिंदूर ऑपरेशनमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी करमाळा येथे देशप्रेमी तिरंगा यात्रा संप्पन.
.
करमाळा प्रतिनिधी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. त्यामुळं भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी देश प्रेमी नागरिकांच्यावतीने करमाळा शहरांमध्ये रविवार दिनांक १८,मे रोजी तिरंगा यात्रा रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीची सुरुवात किल्ला वेस येथून झाली. भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद वीर जवान तुझे सलाम याच्या घोषणा देत देशभक्तीचे गाणी गात नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पुष्पगुच्छ यांचा वर्षाव करत नागरिकांनी भारतीय सैनिकांच्या शौर्याला अभिवादन केले. भारतीय नागरिकांनी सैनिकांच्या पाठीशी उभा राहत त्यांचे मनोबल उंचावणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी सैनिक हंसराज पाटील यांनी केले.
पहलगाम अतिरेकी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. यानंतर भारतीय सैन्याला पाठींबा म्हणून करमाळा भाजपा व देशप्रेमी नागरिकांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीला संबोधित करताना माजी सैनिक पाटील बोलत होते.करमाळा शहरातील किल्ला वेस येथून या रॅलीची सुरवात झाली व शहरातील प्रमुख मार्गांवरून ‘वंदे मातरम’ भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत फूल सौंदर चौक, जय महाराष्ट्र चौक, सुभाष चौक मार्गे मेन रोड वरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. या रॅलीमध्ये भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ.रश्मी दिदी बागल भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे, शिवसेना नेते दिग्विजय बागल ,भाजप प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन ,करमाळा भाजप ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन पिसाळ, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, शिवसेना महिला तालुकाध्यक्ष प्रियांका गायकवाड भाजप महिला आघाडी सरचिटणीस राजश्री खाडे , महिला तालुकाध्यक्ष संगीता नष्टे करमाळा भाजप मंडळ तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम बंडगर, माजी शहराध्यक्ष डॉक्टर श्रीराम परदेशी , भाजप उद्योग आघाडी अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी प्रदेश सदस्य बाळासाहेब कुंभार, प्रवीण गायकवाड, भाजप आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष दिनेश मडके पत्रकार जयंत दळवी, आण्णा सुपनवर, नागेश केकान, मोहन शिंदे, संकेत दयाळ, भैय्या आलाट,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, भाजप ज्येष्ठ नागरिक शेलचे तालुका अध्यक्ष विष्णू रंदवे, तालुका सरचिटणीस बंडू शिंदे, शहर सरचिटणीस सचिन चव्हाण,शहर उपाध्यक्ष राजु सय्यद,मकाईचे संचालक राजेंद्र मोहोळकर सूरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, प्राचार्य मिलिंद फंड ,ज्ञानेश पाटोळे, नितीन कांबळे, अजीम कुरेशी संतोष कांबळे सागर गायकवाड दिग्विजय घोलप महादेव गोसावी, गणेश महाडिक, जयंत काळे पाटील,संतोष जवकर गणेश वाशिबेंकर संजय जमदाडे उपस्थित होते.भारतीय सैनिकांनी भारत मातेच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवून 27 निष्पाप बळी गेलेल्या भारतीय नागरिकांचा बदला घेऊन दहशतवादी व त्यांच्या म्होरक्या अड्ड्यांचा खात्मा केला आहे. आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या प्रति कृतज्ञता आभार व्यक्त करण्यासाठी भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .सदर तिरंगा यात्रा किल्ला वेस, फुलसौदर चौक ,जय महाराष्ट्र चौक ,सुभाष चौक, दत्त पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सदर रॅलीचा समारोप करण्यात आला. शेवटी राष्ट्रगीताने तिरंगा यात्रा रॅली संपन्न झाली.



