करमाळा तालुक्याचे नेते चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ऑक्टोंबर रोजी समाज प्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे नेते माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे कट्टर समर्थक लोकनियुक्त आदर्श मा.सरपंच, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माझी व्हाईस चेअरमन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत जिल्हा कार्यकारणी सदस्य चंद्रकांत काका सरडे यांच्या 15 ऑक्टोंबर रोजी असलेल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ किर्तनकार धर्माचार्य समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन 15 ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ ते 11 या वेळेमध्ये चिकलठाण नं१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ठेवण्यात आले असून या किर्तन व अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी व वारकरी संप्रदायातील भावीक भक्तांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रकांत काका सरडे युवा मंच अष्टविनायक गणेश तरुण मंडळ व ग्रामस्थ करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.


