पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीचा थांबा चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान ब्रीज इतर विकास कामांविषयी ग्रामस्थांना खासदार निंबाळकर यांचे आश्वासन-ॲड अजित विघ्ने
केत्तुर प्रतिनिधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समवेत आज उजनी रेस्ट हाऊसवर महत्वपुर्ण बैठक पार पडली, यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुर्यकांत भाऊ पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील, केत्तुर व्यापारी संघाचे अध्यक्ष राजुशेठ कटारिया, माजी सरपंच ॲड, अजित विघ्ने, विलास सोनवणे, पंडीतराव माने व ग्रामस्थ शिष्ट मंडळ उपस्थित होते. या वेळी पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीचा थांबा आणि चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान ब्रीज व इतर अनेक विकास कामांविषयी चर्चा झाली. यावेळी खासदार निंबाळकर यांनी मी केम, जेऊर नंतर आता पारेवाडीला एक एक्सप्रेस गाडीचा थांबा लवकरच मंजुर करून देणार असले बाबत ठोस आश्वासन दिले असुन, पोमलवाडी ते चांडगाव दरम्यान चा पुल झाल्यास मराठवाडा चे पश्चिम महाराष्ट्र दरम्यान होणारे कनेक्शन आणि त्याचे मुळे होणारा सर्वांगिन विकास याबाबत सविस्तर चर्चा केली व लागलीच संबंधित अधिकारी वर्गाला स्थळपहाणी करणे बाबत व प्रस्ताव तयार करणे बाबत च्या सुचना दिलेल्या आहेत. फलटण- नातेपुते- वालचंदनगर- कळस- लोणी देवकर ते चांडगाव- पोमलवाडी ते राशीन/ करमाळा मार्गे मराठवाड्या शी कनेक्शन होणारा हा मार्ग झाल्यास बायपास रस्त्यासह नवीन मार्ग होण्यासाठी प्रयत्न करणार असले बाबत सांगितले आहे. लवकरच या ठिकाणी अधिकारी वर्गा बरोबर पाहणी दौरा होणार असुन करमाळा तालुक्याचे विकासाला चालना देण्यासाठी या महत्वपुर्ण कामांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे शिष्टमंडळाने व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
