करमाळा

वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर

करमाळा प्रतिनिधी वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव ‌ यांच्यावतीने करमाळा येथील उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना‌ वसु नंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये निर्भीडपणे कार्यक्षमतेने काम करणाऱ्या कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक राजकीय शिक्षण पत्रकारिता उद्योग व्यवसाय इंजिनिअर वकील पोलीस सैनिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ‌ व्यक्तींचा गौरव करण्यात येत असतो. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा शाखा अध्यक्ष म्हणूनही संतोष काका कुलकर्णी काम करत असून भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणूनही ते काम करत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संतोष काका कुलकर्णी यांनी क्लासिक कंपनीच्या नावाने महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यामध्येही आपल्या ऑइल कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला आहे. उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये ‌ कुठलीही पार्श्वभूमी नसताना‌ जिद्द चिकाटी परिश्रम यांच्या जोरावर ‌ आदर्श उद्योजक म्हणून ‌ करमाळा तालुक्यात त्यांचा नावलौकिक आहे. संतोष काका कुलकर्णी यांच्या कार्याची दखल वसु नंदिनी फाउंडेशनने घेतली असून‌ जीवनात मानाचा तुरा रवणाऱ्या संतोष काका कुलकर्णी यांना वसु नंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार 2025 यांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संतोष काका कुलकर्णी यांना वसु नंदिनी ‌ फाउंडेशन चा उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष ‌ दिनेश मडके ,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब होशिंग, राजुरी चे सरपंच राजेंद्र भोसले, यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‌

error: Don\'t try to copy. Content is protected !!