करमाळा शहरातील साईनाथ मित्र मंडळ कुंकू गल्ली यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त ४ संप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी साईनाथ मित्र मंडळ कुंकू गल्ली यांच्यावतीने गणेशाची पारंपारिक हलगी वाद्याने मिरवणूक काढत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. साईनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष सार्थक सुरवडे उपाध्यक्ष विक्रांत पेठकर अभिजीत खडके खजिनदार अरिहंत शहा कार्याध्यक्ष मनीष गायकवाड सचिव विक्रांत साळवे व कार्यकर्त्यांच्या जेष्ठ मार्गदर्शकाच्या सहकाऱ्यांने गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून या मंडळाच्या श्री गणेशाच्या आरतीला प्रसिद्ध डॉक्टर रोहन पाटील, नगरसेवक प्रशांत ढाळे, नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांनी आरती करून साईनाथ मित्र मंडळाचे कौतुक केले आहे. साईनाथ मित्रमंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री सात ते दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


