Friday, September 18, 2026
Latest:
करमाळा

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात सत्याग्रह आंदोलन

करमाळा प्रतिनिधी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.देशातील विशेषतः महाराष्ट्रातील अनेक भागात पुरामुळे शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झालेली आहेत. जमिनी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आहेत. अनेकाच्या घरांचे व घरातील साहित्याचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सामान्यांचे जीवन अतिशय संकटात आहे त्यासाठी आज महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही पुढील मागण्यांसाठी शांततामय मार्गाने सत्याग्रह करत आहोत.
1)ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण भागात सरसकट व निपक्षपातीपणे पंचनामे करण्यात यावेत.
2)खऱ्या लाभार्थ्यांनाच सरकारी अनुदानाचा फायदा मिळावा.
3)प्रती हेक्टरी रुपये 50 हजार नुकसान भरपाई मिळावी.
4) शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी.
5)विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ करावी व सर्व महसुली कर वसुली थांबवावी.
6)निराधार पेन्शन योजनेची रक्कम लाभार्थ्यांना त्वरित मिळावी.
7)रोजगार हमी योजना त्वरित सुरु करावी.
8)नवीन वीज मीटरच्या माध्यमातून होणारी सामान्यांची लूट थांबवावी.
9)सर्व सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांची अडवणूक होते सरकारी कार्यालयात मोठ्याप्रमाणावर भष्ट्राचाराचे सामाज्य असून सामान्य लोकांची कामे नियम व कायदेशीर तरतुदींप्रमाणे लोकांची पिळवणूक अडवणूक न होता वेळेत करण्याबाबत सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना त्वरित आदेश देण्यात यावेत.
10) लडाख येथील शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करावी.
11)समाजात जातीय, धार्मिक सलोखा निर्माण व्हावा म्हणून सरकारने प्रयत्न करावेत.वरील मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला अन्य मार्गांनी तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.
या प्रसंगी ॲड. सविता शिंदे , डॉ. अमोल दुरंदे सुनिल बापू सावंत, संतोष वारे , विवेक येवले, दशरथ कांबळे, यशपाल कांबळे, सचिन काळे, हनुमंत मांढरे – पाटील, ॲड.नवनाथ बी. राखुंडे, गणेश कुकडे, देवा लोंढे , मोहन राम सुरवसे, विजयमाला चवरे ,मुस्तकिन पठाण, फारुक जमादार, दादासाहेब तनपुरे, जमीर सय्यद, अंगद देवकाते, महादेव पलंगे, प्रतापराव जगताप इ. निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!