करमाळा

सावंत गट समविचारी घटकांना बरोबर घेऊन नगरपरिषद निवडणूक लढविणार- मनोज गोडसे


करमाळा प्रतिनिधी 
करमाळा नगरपरिषदेची निवडणूक सावंत गट शहर विकास आघाडीच्या माध्यमातून समविचारी घटकांना बरोबर घेऊन लढविणार असल्याची माहिती करमाळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे चेअरमन मनोज उर्फ बाळासाहेब गोडसे यांनी दिली आहे.यावेळी गोडसे म्हणाले की,शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सावंत गट करमाळा नगरपरिषदेच्या दहा प्रभागात वीस उमेदवार उभा करणार असून नगराध्यक्ष पदासाठी मोहीनी संजय सावंत, किंवा चैताली सुनील सावंत यांचे उमेदवार म्हणून नाव निश्चित करण्यात येणार आहे.
सावंत गट करमाळा शहराच्या विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणार असुन लवकरच सावंत गटाची बैठक होणार असल्याची माहिती मनोज उर्फ बाळासाहेब गोडसे यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!