किल्ला वेस येथील पुरातन शनी–मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित भाविकांना सहकार्याचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील किल्ला विभागात असलेल्या किल्ला वेस येथील जुने व ऐतिहासिक शनी–मारुती मंदिर सध्या जीर्णोद्धाराच्या प्रक्रियेत आहे. अनेक वर्षांपासून भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या या पुरातन मंदिराची अवस्था काहीशी जीर्ण झाल्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय मंदिर समिती नागरिकांच्या सहकार्याने घेण्यात आला आहे.
सध्या मंदिरात विविध प्रकारची कामे सुरू असून त्यामध्ये मुख्यत्वे कमानी बसविणे, संपूर्ण मंदिराचे रंगकाम, सिलींगचे काम, विद्युत वायरिंग तसेच मारुती मंदिरातील आतील गाभाऱ्याचे नूतनीकरण आदी कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे दर्जेदार पद्धतीने करण्यात येत असून भाविकांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात, या उद्देशाने जीर्णोद्धार केला जात आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम लोकवर्गणीतून व भक्तांच्या देणगीतून उभारली जात असून अद्याप निधी अपुरा आहे. त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी आपल्या श्रद्धेनुसार सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर गुरव यांनी या मोबाईल नंबरवर स 9307349036 संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
किल्ला वेस येथील हे शनी–मारुती मंदिर करमाळा शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. शनीवारी व मंगळवारी येथे विशेष गर्दी होत असून विविध धार्मिक कार्यक्रम, नवस-पूजा व उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर मंदिराचे सौंदर्य अधिक खुलणार असून भाविकांसाठी हे स्थान अधिक आकर्षक व सोयीचे ठरणार आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्य करू इच्छिणाऱ्या भाविकांनी पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:
सचिन काळे (गुरव) – 9561712456
रोहित काळे (गुरव) – 8459545584
संजय भालेराव – 9423334211
शनी–मारुती मंदिराचा जीर्णोद्धार हा केवळ बांधकामाचा नव्हे, तर धार्मिक वारसा जपण्याचा उपक्रम असून नागरिकांनी या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


