भाजप नेते प्रा.रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली आवाटी, मांजरगाव व राजुरीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
करमाळा प्रतिनिधी बोराटवाडी (ता. मान, जि. सातारा) : करमाळा तालुक्यातील आवाटी, मांजरगाव व राजुरी येथील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला. बोराटवाडी येथे आयोजित कार्यक्रमात हा प्रवेश करण्यात आला.
या प्रवेशावेळी आवाटी येथील बाबू मुलानी, रफिक खान, मुजीब पटेल, कदीर पटेल, सोहेल पठाण व अनिस सय्यद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच मांजरगाव येथील माजी सरपंच कल्याण मोरे, रामहरी मोरे, किशोर मोरे, सचिन पाटील, सोमनाथ गरदडे व प्रभाकर मोरे यांनीही पक्षात प्रवेश करत भाजपची ध्येयधोरणे मान्य असल्याचे सांगितले. राजुरी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव व जालिंदर पाटील यांनीही या वेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विकासकामे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे भाजपकडे नागरिकांचा वाढता कल असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या प्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भाजप नेते प्रा. रामदास झोळ, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ बापू झोळ, शेलगावचे माजी सरपंच रायचंद खाडे, तसेच गणेश जाधव, महावीर एकाड, बापू वाडेकर, संदीप सरडे, गोपीनाथ पाटील, संजय जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, हर्षद आढाव आदी उपस्थित होते.


