करमाळा

हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रमजान ईद निमित्त शेकडो किराणा कीटचे वाटप….

करमाळा-प्रतिनिधी
रमजान ईद निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा ही हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रमजान ईद निमित्त शिरखुर्मा व किराणा साहित्याचे वाटप, करमाळा औद्योगिक वसाहती मधील कार्यालयात हाजी अल्ताफ शेठ तांबोळी यांच्या वतीने 300-350 कीट चे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांनी सांगितले कि, हाजी उस्मानशेठ तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी रमजान ईद, दिवाळी, व आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्याना अन्नदान करतो. यामध्ये आम्ही निस्वार्थ भावनेने आमच्या वतीने सर्वांची जेवढी सेवा करता येईल. तेवढी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आम्ही करमाळा नगरपालिका निवडणुकीत मुस्लिम बहुल भागातून निवडणुकीला सामोरे गेलो होतो. सदरच्या निवडणुकीत आमचा थोडक्या मतांनी पराभव जरी झाला असला, तरी आम्ही कोणत्या ही लोकांवर नाराज नाही. कारण राजकारण आणि समाजकारण ह्या दोन्ही वेगळ्या बाजू आहेत. आम्हाला परमेश्वराने देणारांच्या रांगेत उभा केले आहे. त्यामुळे आम्ही येथे समाजसेवा करत असताना कोठे ही कमी पडणार नाही.अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आम्ही सदरची समाजसेवा निस्वार्थ भावनेने करत आलो आहोत. यापुढे देखिल आमची पुढील पिढी अशीच जनसेवा सातत्याने करत राहील. अशाप्रकारचा आशावाद हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी अमीरशेठ तांबोळी (राष्ट्रवादी युवा शहराध्यक्ष), इंदाज वस्ताद, फारुक जमादार, सोहेल पठाण वस्ताद (राष्ट्रवादी शहर अध्यक्ष), अझहर भाई शेख, अमीन बेग, मुश्ताक शेख, अफरोज पठाण, अरमान शेख, अनस बागवान, मुख्तार पठाण, सफरोज आतार, शाहरूख पठाण, नईम पठाण, फरहान शेख इ. जण उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!