Wednesday, August 12, 2026
Latest:
Uncategorized

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या आयुष मोटे व यश लांडगे यांची COEP मध्ये दमदार झेप

*

करमाळा प्रतिनिधी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि मेहनतीची ताकद आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथे शिक्षण घेतलेल्या आयुष मोटे आणि यश लांडगे या दोन विद्यार्थ्यांनी Engineering प्रवेश प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.दोन्ही विद्यार्थ्यांना पुण्यातील नामांकित COEP College of Engineering, Pune येथे Engineering साठी प्रवेश मिळाला आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत COEP सारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयापर्यंत पोहोचणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.या यशामुळे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, संस्थेतील विद्यार्थी मोठ्या शैक्षणिक संधींच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून आले आहे.
आयुष मोटे आणि यश लांडगे यांच्या यशामागे पालकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्थेचे संस्थापक प्रा डॉ निकत सरांचे योग्य शैक्षणिक नियोजन आणि विद्यार्थ्यांची मेहनत व सातत्य यांचा मोलाचा वाटा आहे.गावाकडून COEP पर्यंतचा हा प्रवास अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा परिवाराच्या वतीने
आयुष मोटे व यश लांडगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

error: Don\'t try to copy. Content is protected !!