Tuesday, September 15, 2026
Latest:
Uncategorized

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी
श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत दोन जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या दुहेरी गौरवामुळे संगोबा परिसरासह करमाळा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंतजी आसगावकर यांच्या हस्ते सुनील शिंदे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक संघाचे निमंत्रक सुभाषजी माने, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजीराव माने, सचिव बापूराव निळ यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. शिंदे सरांच्या कुटुंबीयांचीही यावेळी उपस्थिती होती.
याचबरोबर स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या वतीनेही सुनील शिंदे यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बी. पी. रोंगे-पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि प्रशालेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल या पुरस्कारांच्या माध्यमातून घेण्यात आली. पुरस्कार स्वीकारताना शिंदे सरांनी हा सन्मान केवळ आपला नसून प्रशालेतील शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी आणि कुटुंबीयांच्या सहकार्याचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली.
या दुहेरी सन्मानाबद्दल श्री संगमेश्वर विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच संगोबा परिसरातील नागरिकांनी मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!