Saturday, September 19, 2026
Latest:
करमाळा

महात्मा गांधी आणि युवा पिढी’ या विषयावर ख्यातनाम विधीतज्ञ संतसाहित्याचे अभ्यासक ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांच्या विशेष व्याख्यान संप्पन

करमाळा प्रतिनिधी करमाळा दि.३/१०/२०२२ येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालया मध्ये महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘ महात्मा गांधी आणि युवा पिढी’ या विषयावर ख्यातनाम विधीतज्ञ आणि संतसाहित्याचे अभ्यासक ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल बी पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, सहसचिव विक्रम सूर्यवंशी,उपप्राचार्य डॉ अनिल साळुंखे, कॅप्टन प्रा संभाजी किर्दाक उपस्थित होते.. नवभारताच्या निर्मिती साठी म. गांधी यांच्या विचारांना पर्याय नसून त्यांच्या विचारांचे अनुकरण आजच्या युवा पिढीने करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ बाबूराव हिरडे यांनी केले. तसेच म. गांधी यांचे विचारच आज देशाला तारून नेवू शकतात असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड यांनी केले. अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ पाटील यांनी म. गांधी यांच्या अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि मौन यांमध्ये असलेल्या सामर्थ्याचे सोदाहरण स्पष्टीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विष्णू शिंदे यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!