देवीचामाळ रोडचे एका बाजूने सुशोभीकरण होणार 49 लाखाचा निधी मंजूर!!! जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी
नेटके हॉस्पिटल ते गादिया घर या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी 49 लाख 76 हजार रुपये मंजूर झाले असूनजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या प्रयत्नांना यश आले आहेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विशेष सहकार्यामुळे करमाळा शहरातील नेटके हॉस्पिटल ते गादिया रोड घर या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी 49 लाख 76 हजार रुपये मंजूर झाले असून आज त्याची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिलीकरमाळा शहरातील देवीचा माळ रोडवरील गादी या घर ते बायपास रोड पर्यंत फुटपाथ करणे वृद्धांना बसण्यासाठी सोय करणे त्याचे सुशोभीकरण करणे मॉर्निंग वाक प्लेस करणेया कामासाठी ही रक्कम मंजूर झाली आहेया कामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून वृद्धांना संध्याकाळी फिरण्यासाठी एक जागा निर्माण होणार आहे तसेच लहान विद्यार्थ्यांना मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र पेज तयार होणार आहेहे काम मंजूर करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रांताधिकारी प्रियंका ताई आंबेकर प्रशासकीय अधिकारी नगरपालिका प्रशासकीय अधिकारी विनाताई पवार यांनी विशेष सहकार्य केलेआचारसंहितेपूर्वी करमाळा शहरात व तालुक्यात जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी माझा प्रयत्न सुरू असून येणाऱ्या वर्षभराच्या काळात करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे


