किरण ढमाले प्रोडक्शन प्रस्तुत यारी ह्या चित्रपटाचे चित्रीकरण लोणी काळभोर येथे संपन्न
करमाळा प्रतिनिधी किरण ढमाले प्रोडक्शन प्रस्तुतयारी ह्या चित्रपटाचे चित्रीकरण लोणी काळभोर येथे यशस्वी रित्या पार पडले.
ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन ज्ञानेश्वर सागडे असून निर्माते किरण विश्वासराव ढमाले व सागर शामराव राक्षे हे आहेत.
तसेच समीर सोनवणे ह्यांनी यारी हा चित्रपट चित्रित केला असून ह्याचे संकलन प्रितम तूंगे हे पाहत आहेत. तसेच ह्या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन आकाश कारभारी ह्यांनी पाहिले आहे व साऊंड डिझाईन तेजस सुप्नेकर हे पाहत आहेत प्रोडक्शन यश गुणवंत, मुकेश बोईनवाड, करण जर्तोलिया ह्यांनी पाहिले.
तरी ह्या चित्रपटात मुख्य भूमिकेत , घनशाम दरवडे,अपेक्षा चव्हाण, अरबाज शेख, सुनील गोडबोले, पुष्पा चौधरी, धनंजय पातले, तनिष्का चव्हाण, वैष्णवी जानराव ह्यांनी काम केले आहे.
तरी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात यारी हा चित्रपट प्रदर्शित होईल असे प्रसार माध्यमांशी बोलत असताना निर्माते किरण ढमाले म्हणाले.तसेच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी भर भरून प्रतिसाद द्यावा असे विधान निर्माते सागर राक्षे ह्यांनी केले आहे.
