करमाळा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व भूगोल विभागाच्या वतीने आज ११जुलै जागतिक लोकसंख्या दिन साजरा

करमाळा प्रतिनिधी. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व भूगोल विभागाच्या वतीने आज ११जुलै जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. अंकुश करपे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी. पाटील हे होते. तसेच वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. विजयराव बिले हे ही उपस्थित होते. प्रा.अंकुश करपे यांनी आपल्या व्याख्यानातून लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. आणि त्यावर विचारमंथन केले. प्रा.डॉ. एल.बी. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले तसेच लोकसंख्या वाढ संख्यात्मक होऊन चालत नाही तर गुनात्मक होणे गरजेचे असल्याचे ही मत व्यक्त केलं. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकसंख्या वाढीची कारणे परिणाम दर्शवणारे भित्तिपत्रके तयार केली सदरील भीतीपत्रिकांचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या भितीपत्रकांमधून विद्यार्थ्यांना लोकसंख्या वाढ आणि निर्माण होणाऱ्या समस्या यांचा सविस्तर अभ्यास करता येईल असे मत प्रा. कृष्णा कांबळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रा.कृष्णा कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभाग प्रमुख डॉ. विजया गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मराठी विभागाच्या प्रा.वंदना भाग्यवंत यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!