करमाळा

करमाळा येथे गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली संप्पन

करमाळा प्रतिनिधी– स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे नेतृत्व भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केले. रॅलीची सुरुवात भाजप संपर्क कार्यालय येथून झाली व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप झाला.
या रॅली मार्गातील महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले. या रॅलीत शहरातील महिला व युवकांसोबत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या रॅलीमध्ये विशेष आकर्षण ठरले ते कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक पध्दतीने केलेले लेझिम सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकले.
यावेळी गणेश चिवटे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “तिरंगा केवळ राष्ट्रध्वज नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्य, बलिदान आणि एकतेचे प्रतीक आहे. युवकांनी राष्ट्रभक्तीचा हा दीप कायम प्रज्वलित ठेवावा असे सांगितले.
रॅली दरम्यान शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून तिरंगा ध्वजाला सलामी दिल्या, तर व्यापाऱ्यांनी दुकानासमोर फुले व पताका लावून स्वागत केले.
या भव्य तिरंगा पदयात्रेमुळे करमाळा शहरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणखीनच वृद्धिंगत झालेला दिसुन आला,
या तिरंगा रॅलीसाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, सरचिटणीस नितीन झिंजाडे, आजिनाथ सुरवसे, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, अमोल पवार ,सोमनाथ घाडगे , जयंत काळे पाटील, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर, भैय्याराज गोसावी, हर्षद गाडे, प्रदीप देवी , बंडू शिंदे, विष्णू रंदवे , विजय भांडवलकर , सचिन गायकवाड, गणेश माने, प्रवीण शेळके ,सचिन कानगुडे ,जयसिंग भोगे , वसीम सय्यद, भैय्या कुंभार, बापू मोहोळकर , राजू पवार , तुकाराम भोसले ,श्रीमंत पाटील, चंद्रशेखर सरडे, कपिल मंडलिक, राजू सय्यद , रंजीत पवार , संगीत नष्टे, राजश्री खाडे, चंपावती कांबळे , प्रमोद पाटील, सुनील नेटके, कल्याण नवले, पंकज बिचितकर, किरण बागल , राजेश पाटील, बापू लोंढे, दीपक गायकवाड ,अशोक मोरे , संदिप रेगुडे, गणेश वाळुंजकर, वसुदेव पवार, प्रवीण बिनवडे ,निलेश राख , काकासाहेब थोरवे ,संदीप काळे , चेअरमन ईश्वर मोरे, तुषार जाधव , दत्ता एकाड,यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

error: Don\'t try to copy. Content is protected !!