करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी १४ गोवंश यांना कत्तल करण्याच्या उददेशाने घेवून जात असताना पोलीस निरीक्षक. रणजीत माने, करमाळा पोलीस ठाणे यांनी व त्यांचे पथकांनी केलेली कारवाई

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी -एकुण १४ गोवंश यांना कत्तल करण्याच्या उददेशाने घेवून जात असताना मा. रणजीत माने, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे यांनी व त्यांचे पथकांनी केलेली कारवाई केली आहे.घटनाक्रम क्र.०१-
दि. ०६/१०/२०२५ रोजी २२/०० वा ते २२/३० वा. चे दरम्यान मौजे सावडी ते करमाळा रोडवरील सावडी फाट्यावर येथे इसम नामे १) सोयब सलीम कुरेशी वय २५ वर्ष रा. पंजाबी वस्ताद चौक करमाळा हा त्याचेकडील पांढ-या रंगाचे पिकअप क्र एम एच ०४ डी डी १७२३ दोन गिर जातीच्या गाई व एक जरशी गाईचे खोंड यांनी त्यांची चारा पाण्याची सोय न करता, दाटीवाटीने निर्दयीपने वागनुक देवून, बांधुन घेवून जात असताना मिळून आला असून त्याचा मालक नामे सोयब सलीम कुरेशी वय २५ वर्ष रा. पंजाबी वस्ताद चौक करमाळा याने जनावरे चारा पाण्याची सोय न करता, दाटीवाटीने बांधुन पाठविली आहेत म्हणुन वगैरे मजकुरचा करमाळा पोलीस ठाणे गुरनं. ८३५/२०२५ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधि. कलम ११ (१), (क), (घ), (ङ), (च), (ज) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचे मा.श्री. रणजित माने सो।, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे अनुषंगाने करमाळा पोलीस ठाणेकडील पोहेकॉ/१२४ ढेंबरे, पोना/५३८ व पोकॉ/९४३ कांबळे असे पथकासह माहिती मिळालेल्या ठिकाणी येथे जावुन सदर वाहनाचा संशय आल्याने त्यास थांबवुन सदर वाहनाचा नंबर पांढ-या रंगाचे पिकअप क्र एम एच ०४ डी डी १७२३ हा मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून सदर वाहन चालक सोयब सलीम कुरेशी वय २५ वर्ष रा. पंजाबी वस्ताद चौक करमाळा याचेकडे विचारपुस करून सदर वाहनाची पाहणी केली असता सदर पथकास त्यामध्ये दोन गिर जातीच्या गाई व एक जरशी गाईचे खोंड यांना चारा पाण्याची सोय न करता, दाटीवाटीने निर्दयतेने वागणुक देवून त्यांना दाव्याने बांधुन, त्यांचे औषधोपचाराची कोणतीही सोय न करता त्यांची कत्तल करण्याच्या उददेशाने कोणताही वाहतुक करण्याचा परवाना जवळ नसताना मिळुन आल्याने सदरबाबत मा. रणजित माने सो। यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवून सदर इसमांविरूध्द करमाळा पोलीस ठाणेस पोकॉ/९४३ सोमनाथ कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असुन सदर इसम सोयब सलीम कुरेशी वय २५ वर्ष रा. पंजाबी वस्ताद चौक, करमाळा ता. करमाळा, जि. सोलापुर यास पोलीसांनी ताब्यात घेवून त्याचेवर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / १२४ दुष्यंत ढेंबरे हे करीत आहेत.
घटनाक्रम क.०२-
दि.०७/१०/२०२५ रोजी ००/३० वा. सुमारास करमाळा शहराचे हद्दीतील जामखेड ते करमाळा रोडवरील जामखेड नाका येथे केशरी रंगाचा आयशर टेम्पो गाडी नंबर एम.एच.१६ए. वाय. ४५८६ मध्ये ०१ काळा पांढ-या रंगाचा जरशी गाई, ०२ पांढ-या रंगाचे बैल, ०२ काळ्या रंगाचे बैल, ०३ लाल रंगाचे बैल, ०१ भुर्या रंगाचा बैल व ०२ काळ्या टिपक्याचे बैल एकुण ११ गोवंश है इसम नामे १) इन्जेमामुलहक अजीजुलहक सय्यद वय ३० वर्ष रा. खडकपुरा सायगाव ता. आंबेजोगाई जि बीड २) अफरोज जामालुद्दीन सय्यद वय २५ वर्ष रा. पिंपडा धायगुडा ता.ता. आंबेजोगाई जि बीड यांनी ३) जनवारांचे मालक सोयब कुरेशी बस स्टॅन्डजवळ आंबेजोगाई जि बीड यांचे सांगण्यावरुन सोयब कुरेशी याचे मालकीची जनावरे नमुद आयशर टेम्पोमध्ये कोंबून बांधून त्यांना निर्दयतेने वागणूक देवून जनारांची चारा पाणीची सोय न करता तसेच त्यांना औषधाची सोय न करता आयशरमधुन केवळ कत्तली करीता घेवून जाणे करीता आणल्याचे मिळून आलेले आहेत म्हणुन वगैरे मजकुरचा करमाळा पोलीस ठाणे गुरनं. ८३६/२०२५ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधि. कलम ११(१), (अ), (एफ), (एच), (आय), (के) सह महाराष्ट्र पशु सरंक्षण अधि. कलम ५ व ९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचे मा.श्री. रणजित माने सोो, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे अनुषंगाने करमाळा पोलीस ठाणे अंतर्गत जामखेड चौक, करमाळा येथे रात्रपाळी दरम्यान असलेल्या नाकाबंदीचे पोलीस अंमलदार पोहेकॉ / १६३९ हिंगमीरे, पोकॉ/२०२७ राउत, पोकॉ/३४८ कदम व पोकॉ/९४३ कांबळे यांना सदर बातमीचा आशय सांगुन सदर वाहन थांबवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केल्याने सदर नाकाबंदीचे पोलीस अंमलदार यांनी बातमीप्रमाणे आलेल्या संशयीत वाहन आल्याने त्यास थांबवुन सदर वाहनाचा नंबर केशरी रंगाचा आयशर टेम्पो गाडी नंबर एम.एच.१६ए.वाय. ४५८६ हा मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून सदर वाहनामध्ये असलेले इसम नामे १) इन्जेमामुलहक अजीजुलहक सय्यद वय ३० वर्ष रा. खडकपुरा सायगाव ता. आंबेजोगाई जि बीड २) अफरोज जामालुद्दीन सय्यद वय २५ वर्ष रा. पिंपडा धायगुडा ता. ता. आंबेजोगाई जि बीड यांचेकडे विचारपुस करून सदर वाहनाची पाहणी केली असता सदर टेम्पोमध्ये ०१ काळा पांढ-या रंगाचा जरशी गाई, ०२ पांढ-या रंगाचे बैल, ०२ काळ्या रंगाचे बैल, ०३ लाल रंगाचे बैल, ०१ भुर्या रंगाचा बैल व ०२ काळ्या टिपक्याचे बैल एकुण ११ गोवंश यांना चारा पाण्याची सोय न करता, दाटीवाटीने निर्दयतेने वागणुक देवून त्यांना दाव्याने बांधुन, त्यांचे औषधोपचाराची कोणतीही सोय न करता त्यांची कत्तल करण्याच्या उददेशाने कोणताही वाहतुक करण्याचा परवाना जवळ नसताना जनवारांचे मालक ३) सोयब कुरेशी बस स्टॅन्डजवळ आंबेजोगाई जि बीड याचे सांगणेवरून घेवून जात असताना मिळुन आले आहेत. सदरबाबत मा. रणजित माने सो। यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवून सदर इसमांविरूध्द करमाळा पोलीस ठाणेस पोकॉ/९४३ दिपक कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असुन सदर इसमांना पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा. पो. उपनिरीक्षक दादासाहेब वाडगे हे करीत आहेत.सदर गुन्हयातील मिळून आलेल्या जनावरांना कोणताही पास परवाना नसताना तसेच त्यांची वाहतुक करण्याच्या उददेशाने वाहतुक करण्याचा कोणताही परवाना नसताना वाहतुक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी पण सदर असे लोक बेकायदेशिरपणे अशा प्रकारचा गुन्हा करतात. आम्ही सदर गुन्हयात मिळून आलेली सर्व जनावरे यांची वैदयकिय अधिकारी, पशुधन विभाग, करमाळा यांचेकडुन त्यांची वैदयकिय तपासणी करून त्यांची कोणतीही गैरसोय न करता त्यांना शासन प्रमाणित असलेल्या गोशाळेमध्ये ठेवून त्यांची योग्य ती निगा राखुन त्यांची काळजी घेणेबाबत त्यांना विनंती करण्यात आली आहे.सदर करमाळा पोलीस ठाणेकडील या केलेल्या उल्लेखणीय कारवाईमुळे अनेक गोवंश यांची अमानुषपणे कत्तल होण्यापासुन प्रतीबंध होवु शकतात. संदरच्या गोवंश यांना शासन प्रमाणित असलेल्या गोशाळेमध्ये ठेवुन त्यांची व्यवस्थीत निगा राखली जाते. त्यांचे चारा पाणी तसेच औषधोपचाराची योग्य ती दखल घेतली जाते अशा प्रकारच्या शासनाच्या अनेक योजना असताना देखील असे काही लोक गोवंश सारख्या पशुंना त्यांची कत्तल करून आपला व्यवसाय करण्याच्या उददेशाने कायदयाचे उल्लंघन करतात. अशा कारवाईमुळे असे कृत्य करणा-या लोकांवर आमची कडक नजर असुन आम्ही अशा प्रकारचे गुन्हे करण्या-या इसमांवरती कडक कारवाई करण्याचे आमचे लक्ष आहे.सदरची कामगिरी ही श्री. अतुल कुलकर्णी साो, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, डॉ. प्रितम यावलकर साो, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, श्री अंजना कृष्णा व्ही.एस. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा, श्री. अशोक सायकर साो, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी चार्ज उपविभाग करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रणजित माने, सोो, पोलीस निरीक्षक, पोहेकॉ ढेंबरे, पोना/ पोकॉ कांबळे तसेच पोहेकॉ/१६३९ हिंगमीरे, पोकॉ/२०२७ राउत, पोकॉ कदम व पोकॉ कांबळे यांनी केली आहे.


