दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला आयडियल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज केत्तूर नं१ चा इयत्ता दहावी चा १०० टक्के निकालाची परंपरा कायम
करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला आयडियल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज केत्तूर नं१ ने आपला उत्कृष्ट निकालाचा वारसा यंदाही जपला आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत प्रशालेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा झेंडा फडकावला आहे.
महाराष्ट्र राज्य मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रशालेतील एकूण १७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत *१) समृध्दी अजित जगताप:-८९.००,%* गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला
*२) प्रांजली भैरवनाथ झोळ:-८८. ६०%* गुणांसह द्वितीय क्रमांक
*३) संस्कार आबासाहेब चव्हाण:-८६.८०%* गुण मिळवून तृतीय क्रमांक
*४)सिद्धी श्रीकांत साखरे:-८६.६०%* गुण
मिळवून चतुर्थ क्रमांक
*५) युवराज धनाजी चोरमाले :- ८६.४०* गुण मिळवून पाचवा क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले
*विशेष प्राविण्य मिळवलेले एकुण विद्यार्थ्यी ११, प्रथम श्रेणीत आलेले विद्यार्थी ४, द्वितीय श्रेणी प्राप्त केलेले विद्यार्थी २*
प्रशालेच्या या यशाचे गमक म्हणजे वर्षेभर राबवण्यात आलेल्या सराव परीक्षा, बोर्डाच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमधील भीती निघून जावी आणि वेळेचे नियोजन जमावे, यासाठी प्रशालेने विशेष सराव परीक्षेचे आयोजन केले होते.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी वैयक्तिक मार्गदर्शन केले.
शिक्षकांनी दिलेला वेळ, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन आणि कठिण विषयांसाठी घेतलेली उजळणी यामुळे गुणवत्तेत वाढ झाली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद मेहनत घेत आहेत.
*विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रा.रामदास झोळ सर, सचिवा सौ.माया झोळ मॅडम, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री.डॉ.विशाल बाबर सर, स्कूल डायरेक्ट सौ.नंदा ताटे मॅडम,प्रशालेचे प्राचार्य श्री.विजय मारकड सर, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.*


