Thursday, August 6, 2026
Latest:
करमाळा

लोकवर्गणीतून शेलगाव क येथे हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

करमाळा प्रतिनिधी
शेलगाव क येथे आज दि.८ मे रोजी पूजा ,होम हवन करून हनुमंताच्या जुन्या मूर्तीचे विसर्जन व विधिवत नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली .याप्रसंगी २ दिवस कीर्तन, भजन अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. पंढरपूर येथून हनुमंताची मूर्ती आल्यानंतर त्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर सदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
नागनाथ महाराज यात्रा उत्सव समितीच्या वतीने उत्सवातील शिल्लक रकमेतून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आलेले आहे.यात्रा उत्सवातून शिल्लक राहिलेल्या रकमेमधून गावातील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केलेला आहे . यापूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व विकास निधीतून गावातील जिल्हा परिषद शाळेचा व अंगणवाडीचा चेहरा मोहरा बदललेला आहे. आता मंदिरांचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे.
मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घेणारे आजिनाथ वीर व आत्माराम वीर यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. प्रसाद व भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली ‌

error: Don\'t try to copy. Content is protected !!