Monday, July 27, 2026
Latest:
Uncategorized

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पांडुरंगाच्या नामघोषात बाल दिंडी साजरी

करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल येथे बाल दिंडी उत्साही वातावरणात साजरी झाली. संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी व पालक यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच माऊलींच्या प्रतिमेचे पूजन केले. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भिंत चालवली हा सीन या वेळी सादर करण्यात आला. नंतर ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, जय जय राम कृष्ण हरी, हे म्हणत पालखी घेऊन दिंडी निघाली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, वारकरी, आदी वेशभुषा केली होती. हातात भगवे झेंडे, टाळ, मृदंग यांच्या साथीने विठ्ठलाच्या जयघोषात वारी निघाली होती. स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी देखील यात सहभाग घेतला होता. पालक वर्गातून गोविंद विटकर यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी, सहशिक्षिका शिवांगी कांबळे, शुभांगी खळदकर, रोहिणी गरड, अमृता पाटील, अश्विनी झाडबुके, सविता पवार, कृष्णा पवार, संजय शिंदे, युवराज कानगुडे, गुलफाम कुरेशी, सर्व विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!