चांडगाव ता- इंदापुर ते पोमलवाडी ता- करमाळा दरम्यानचे मंजुर पुलाचे काम कुगाव-शिरसोडी पुलाप्रमाणे लवकरच चालू होत आहे.. दळणवळणामुळे आपल्या भागाचा कायापालट निश्चित आहे- ॲड.अजित विघ्ने उपसभापती पं. स. करमाळा
करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वपूर्ण आणि कमी अंतरातला(७६५ मीटर) पुल मौजे. चांडगाव ता- इंदापुर जि- पुणे ते मौजे. पोमलवाडी ता- करमाळा, जि- सोलापुर दरम्यानचे पुलाला मागील अर्थसंकल्पात स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शिफारसीने व कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचे सहकार्याने तसेच करमाळ्याचे माजी आमदार.संजयमामा शिंदे यांचे मागणी पत्राप्रमाणे व पाठपुराव्याने तब्बल ३४० कोटी रुपयांची मंजुरी मिळालेली असुन, या पुलाचे कामाची निविदा प्रसिद्ध झालेली होती. या पुलाचे निविदे प्रमाणे आता हे काम लवकरच चालु होण्याच्या प्रतिक्षेत आहे.सदर पुलाचे काम गुजरातमधील पटेल इंजिनियर्स या कंपनीने घेतलेले असुन,अत्याधुनिक पद्धतीने पुलांची निर्मिती करणारी ही नावाजलेली कंपनी आहे. निविदा प्रक्रिया अंतिम झालेली असुन श्री गणेशाचे आगमानाबरोबर लवकरच हे काम चालु होणार असलेची माहिती करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.


