जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर ऋतुजा भांडवलकरची परदेशात भरारी; संघर्षातून यशाचा प्रेरणादायी प्रवास!”……
करमाळा प्रतिनिधी….
करमाळ्याच्या श्री हनुमंत भांडवलकर व सौ राधा हनुमंत भांडवलकर यांची तीन नंबरची कन्या सौ ऋतुजा तिची परदेशात भरारी घेतली आहे.
फिलिपाईन्स येथे काम करण्याची संधी….
मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येत आपल्या मेहनतीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर ऋतुजाने परदेशात काम करण्याची संधी मिळवली आहे. करमाळ्यातील ऋतुजाची नोकरीच्या प्रोजेक्टसाठी फिलिपाइन्स येथे निवड झाली असून, तिच्या या यशामुळे कुटुंबीयांसह परिसरातून तिचे कौतुक होत आहे….
मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांसाठी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास अनेकदा आव्हानात्मक असतो. अशा परिस्थितीत आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करत आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळवणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
ऋतुजाने मिळवलेली ही संधी करमाळ्यातील तरुणींसाठी प्रेरणादायी ठरू शकते. जिद्द, मेहनत आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला, तर मोठी स्वप्ने साकार करता येतात, हा संदेश तिच्या प्रवासातून मिळतो.
ऋतुजाच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
करमाळ्याच्या या लेकीच्या यशामुळे तिच्या कुटुंबाची मान अभिमानाने उंचावली आहे……
शुभेच्छुक भांडवलकर परिवार


