Monday, September 14, 2026
Latest:
Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड अध्यक्षपदी अल्लाउद्दीन शेख उपाध्यक्षपदी जय बिडकर शुभम कोंगे सचिवपदी भैय्या सुर्यवंशी यांची निवड

करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. मंडळाचे मार्गदर्शक सुनील बापू सावंत, ॲड. राहुल भाऊ सावंत, नगरसेवक संजय अण्णा सावंत तसेच मंडळाचे ज्येष्ठ युवा कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी अल्लाउद्दीन शेख, उपाध्यक्षपदी जय बिडकर व शुभम कोंगे, सचिवपदी भैय्या सूर्यवंशी, तर सहसचिवपदी सागर नलवडे यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी भूषण सुरवसे, सहखजिनदारपदी सागर वीर, मिरवणूक प्रमुखपदी जयवंत सोनू बनकर, उपमिरवणूक प्रमुखपदी बंटी शिंदे आणि कार्याध्यक्षपदी अवी सुरवसे यांची एकमताने निवड झाली.
गणेशोत्सव काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांचे नियोजन करून उत्सव उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा मानस नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मंडळाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संदीप दुधाळ यांनी आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!